किड्स किंग्डम अकॅडमीत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा…
किड्स किंग्डम अकॅडमीत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा…
कुकाणा प्रतिनिधी –
किड्स किंग्डम अकॅडमी कुकाणा ,
येथे मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा..
महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती अन् साहित्याचा हा गौरव दिन आहे.
या दिनानिमित्त चिमुकल्यांनी सरस्वती मातेची पूजा करून व नृत्य करून हा दिवस उत्साहात साजरा केला शिक्षिका अनिता बडे, प्रतिभा कदम,रोहिणी सरोदे , पूजा पवार,वैष्णवी कदम शिक्षक आदी शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




