Breaking
ई-पेपर

नेवासा तालुक्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय जीवघेणा? अल्पवयीन व मद्यधुंद चालकांमुळे अपघातांचा धोका वाढला.

0 6 0 5 0 6

नेवासा तालुक्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय जीवघेणा? अल्पवयीन व मद्यधुंद चालकांमुळे अपघातांचा धोका वाढला.

 

नेवासा प्रतिनिधी –

नेवासा तालुक्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यातील अनेक व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहिल्यानगर येथून माल खरेदी करतात. हा माल नेवासा येथे पोहोचवण्यासाठी काही डेली ट्रान्सपोर्ट सेवा कार्यरत आहेत. मात्र, याच सेवांमधून गंभीर अनियमितता होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही ट्रान्सपोर्ट वाहनांवर अल्पवयीन तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले चालक नियुक्त केले जात आहेत. याशिवाय, काही चालक मद्यपान अथवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे रस्ते सुरक्षा धोक्यात येत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.

अशा परिस्थितीत, जर एखादा गंभीर अपघात घडला तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला या बाबींची माहिती आहे का? आणि माहिती असूनही कारवाई होत नसेल, तर संबंधित यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दररोज घडणाऱ्या अपघातांमागे ही कारणे आहेत का, याची सखोल चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, अल्पवयीन किंवा परवाना नसलेल्या चालकांकडे वाहने सोपवणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हा विषय केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी संबंधित असल्याने तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर अहिल्यानगर प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे