*कु. काव्या कुलदीप देशमुख हिने ३०० पैकी २२० गुण मिळवत कुकाणा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला*.
*कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश; ५७ टक्के विद्यार्थी पात्र*

कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश; ५७ टक्के विद्यार्थी पात्र*
कु. काव्या कुलदीप देशमुख हिने ३०० पैकी २२० गुण मिळवत कुकाणा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.
कुकाणा (प्रतिनिधी):
नेवासा तालुक्यातील कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील एकूण २८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेला हजेरी लावली होती. त्यापैकी १६ विद्यार्थी पात्र ठरले असून १२ विद्यार्थी अपात्र राहिले. विद्यालयाचा निकाल समाधानकारक ठरल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या परीक्षेत कु. काव्या कुलदीप देशमुख हिने ३०० पैकी २२० गुण मिळवत कुकाणा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तसेच शारोन सचिन गोर्डे (१८८ गुण), ओम अमोल तुवर (१८४), अदिती सचिन दाते (१७६), आकांक्षा बाबासाहेब उंडे (१७६), गुंजन रामेश्वर वाघमारे (१७४), संदीप निलेश क्षीरसागर (१६६), श्रेयश गणेश माणकेश्वर (१६४), ईश्वरी नवनाथ गोर्डे (१५२), कैवल्य देविदास घुगरे (१५०), सर्वेश सचिन सदावर्ते (१५०), शुभेंद्र नारायण उगले (१५०), सिद्धी निशांत तिडके (१४२), दिव्या सुनील राजत (१४०), भगवान ज्योतिर्लिंग राजत (१३८) आणि मानसी अशोक घुले (१२०) यांनीही यश संपादन करून विद्यालयाचा गौरव वाढविला.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे कुकाणा विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे,” अशी भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.



