*अहिल्यानगरमध्ये ‘ARLE PATIL WEALTH SERVICES’ चा शुभारंभ; आर्थिक सेवा क्षेत्रात विश्वासाचे नवे पर्व*

*अहिल्यानगरमध्ये ‘ARLE PATIL WEALTH SERVICES’ चा शुभारंभ; आर्थिक सेवा क्षेत्रात विश्वासाचे नवे पर्व*
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क
आर्थिक सेवा क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आर्ले पाटील समूहाने आपल्या व्यवसाय विस्ताराला नवी दिशा देत ‘ARLE PATIL WEALTH SERVICES’ या नव्या फर्मचा शुभारंभ प्रोफेसर कॉलनी चौक येथील बिझनेस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात केला.
यापूर्वी ARLE PATIL HEALTH CARE आणि ARLE PATIL पतसंस्था या दोन यशस्वी उपक्रमांद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या आर्ले पाटील समूहाची ही तिसरी फर्म असून, दर्जेदार सेवा, प्रामाणिक व्यवहार आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीमुळे समूहाने बाजारपेठेत विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.
ARLE PATIL WEALTH SERVICESच्या माध्यमातून आर्थिक नियोजन, विविध प्रकारच्या कर्जांचे मार्गदर्शन, गुंतवणूक सल्ला, विमा सेवा तसेच इतर वित्तीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार योग्य आर्थिक मार्गदर्शन करून त्यांचे आर्थिक भविष्य अधिक सक्षम करण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थापक डॉ. गणेश आर्ले पाटील यांनी सांगितले की, “ग्राहकांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. त्याच विश्वासाच्या बळावर आम्ही आरोग्य, सहकार आणि आता आर्थिक सेवा या क्षेत्रातही दर्जेदार, पारदर्शक आणि जबाबदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक ग्राहकाच्या प्रगतीत सहभागी होणे हेच आमचे ध्येय आहे.”
संचालक आयुष आर्ले पाटील म्हणाले, “‘ARLE PATIL WEALTH SERVICES’च्या माध्यमातून आधुनिक आणि विश्वासार्ह वित्तीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. योग्य आर्थिक नियोजन, कर्ज मार्गदर्शन आणि गुंतवणूक सल्ल्याद्वारे प्रत्येक ग्राहकाला सक्षम आर्थिक निर्णय घेण्यासाठी आम्ही सातत्याने मार्गदर्शन करू.”
“आपला विश्वास… आमची जबाबदारी!” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ARLE PATIL WEALTH SERVICES ही फर्म अहिल्यानगरच्या आर्थिक सेवा क्षेत्रात विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शकतेचे नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



