Breaking
ई-पेपर

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा वाचनाने समृद्ध व्हा – प्रसिद्ध गझलकार संजय पठाडे

अ.नगर घुले पाटील कॉलेजला मराठी भाषा गौरव दिन संपन्न.

0 6 0 5 0 6

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा वाचनाने समृद्ध व्हा – प्रसिद्ध गझलकार संजय पठाडे

अ.नगर घुले पाटील कॉलेजला मराठी भाषा गौरव दिन संपन्न.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

​सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलचा वाढता अतिवापर आणि ‘रील्स’ पाहण्यात वाया जाणारा वेळ यावर त्यांनी चिंता व्यक्त केली असून,त्याऐवजी वाचन संस्कृती जोपासण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.प्रमुख विचार आणि व्याख्याते प्रसिद्ध कवी,लेखक,गझलकार प्रा.संजय पठाडे (श्री.संत निळोबाराय विद्यालय, राळेगणसिद्धी,ता.पारनेर)आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,तासनतास रील्स पाहण्याने फक्त वेळ वाया जात नाही,तर एकाग्रताही कमी होते. हे टाळून विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आपले वाचन कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उदाहरण देत ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाबद्दल बोलताना ते म्हणाले की,”ज्ञानेश्वरीची केवळ एक ओवी देखील माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते.”वाचनाची आवड कशी निर्माण करावी,याचे उदाहरण देताना त्यांनी वि.स.खांडेकर यांची ‘ययाती’ या कादंबरीतून त्यांच्यात झालेला बदल स्पष्ट केला.तसेच मुकुंदराज यांचा ‘विवेकसिंधू’ यांसारख्या महान कलाकृतींचा उल्लेख केला. अशा दर्जेदार कादंबऱ्या वाचल्यामुळे भाषेची जाण वाढते आणि वाचनाची गोडी निर्माण होते.मराठी साहित्याला आतापर्यंत चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत. मराठीला मिळालेले ज्ञानपीठ सन्मान हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहेत असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी स्वतःच्या गझल,कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या.जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे,मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात,अहिल्यानगर मराठी विभागाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा.पठाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. के.पंदरकर होते.यावेळी उपप्राचार्य प्रा.पी.ए.फटांगरे, मराठी विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.के.आर.पिसाळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष- समन्वयक डॉ.एस.बी.दहातोंडे आणि कला शाखाप्रमुख प्रा. एस.व्ही.मरकड यांची प्रमुख उपस्थिती होती.​प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन
​आपल्या खुसखुशीत आणि ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना प्रा.संजय पठाडे यांनी मराठी साहित्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांनी उपस्थितांना मराठी भाषेच्या समृद्ध वारशाची जाणीव करून दिली.​अध्यक्षीय मनोगत
​प्राचार्य डॉ.ए.के.पंदरकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचन आणि लेखनाची गोडी निर्माण व्हावी,यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली व ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख,-डॉ.के.आर.पिसाळ यांनी केले.प्रमुख मान्यवरांचा परिचय वाणिज्य विभाग समन्वयक प्राध्यापिका के.एस.कराड यांनी करून दिला,तर आभार प्रदर्शन मराठी विभागाच्या वतीने परीक्षा समन्वयक-प्राध्यापक डॉ.आर.ए.नेटके यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे