दीर्घ प्रतिक्षेत असलेल्या सुरेगाव नेवरगाव जोडणाऱ्या गोदावरी पुलाचे आज ना.विखेयांच्या हस्ते उद्घाटन….
गोदावरी पुलाचे आज ना.विखेयांच्या हस्ते उद्घाटन.... माजी आ.मुरकुटेंची कार्यक्रमाला उपस्थिती राहणारका?याकडे सर्व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष...
दीर्घ प्रतिक्षेत असलेल्या सुरेगाव नेवरगाव जोडणाऱ्या गोदावरी पुलाचे आज ना.विखेयांच्या हस्ते उद्घाटन…. माजी आ.मुरकुटेंची कार्यक्रमाला उपस्थिती राहणार का?याकडे सर्व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष…..
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
प्रदीर्घ प्रतिक्षेत असलेल्या सुरेगाव नेवरगाव जोडणारे गोदावरी पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम आज जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता श्री सदगुरु नारायणगिरी महाराज आश्रम सुरेगाव रस्ता नेवासा बुद्रुक येथे पार पडणार आहे .
सुमारे 50 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या नेवासा तालुक्यातील दुसरा पुल साकार होणार आहे नेवासा मेन रोड पासून सुरेगाव पर्यंत रस्ता आणि नदीवरील पूल अशा संपूर्ण कामाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या पुलामुळे नेवासा, गंगापूर, वैजापूर हे तालुके जोडले जाणार आहेत या कार्यक्रमास गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर अध्यक्षस्थानी असतील तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील नेवाशाचे आमदार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे सर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे परंतु या कार्यक्रमा मध्ये नुकतेच महायुतीमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेली नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थिती दर्शनावर का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
