निर्मलाताई काकडे यांचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान :-प्रा .वंदना पुजारी
निर्मल ब्राईट स्कूलमध्ये जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन.

*निर्मलाताई काकडे यांचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान :-प्रा .वंदना पुजारी
निर्मल ब्राईट स्कूलमध्ये जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन.
शेवगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
: आदरणीय निर्मलाताई काकडे यांच्या कार्याला शब्दरूपी उजाळा दिला . *”ताईंच्या महान कार्यामुळेच आपण येथे सर्वजण आहोत”* हे कार्य अविरतपणे सुरू राहील असे प्रतिपादन प्रा. वंदना पुजारी यांनी केले.
येथील निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलमध्ये स्व .निर्मलाताई काकडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. निर्मलाताई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वंदना पुजारी, स्कूलचे सहसमन्वयक ज्ञानेश्वर लबडे, प्राचार्य दत्तात्रय मोरे उपस्थित होते.
निर्मलाताई काकडे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या व मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच ताईंच्या जीवनावर आधारित एक छोटी नाटिका सादर करण्यात आली . अध्यक्षीय भाषणात प्रा. दत्तात्रय मोरे मुलांचा सर्वांगीण विकास तसेच शाळेला उच्च स्तरावर नेण्यासाठी अविरत प्रयत्न करू असे सांगितले .शीला सरगर व साक्षी हुश्शार यांनी निर्मला ताईंचे जीवनविषयक अनुभव सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी वाघमारे यांनी केले. बाळू नीळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. उज्वला गरुड यांनी आभार मानले.