Breaking
ई-पेपर

*बंद झालेली अहिल्यानगर–दहिगाव एसटी पुन्हा धावली*

*माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; कुकाणा येथे जल्लोषात स्वागत*

0 8 9 9 1 8

*बंद झालेली अहिल्यानगर–दहिगाव एसटी पुन्हा धावली*

*माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; कुकाणा येथे जल्लोषात स्वागत*

नेवासा तालुका | प्रतिनिधी-

काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव एसटी बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून, या बससेवेमुळे कुकाणा व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बस कुकाणा बसस्थानकावर दाखल होताच ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करून आनंद व्यक्त केला.

बससेवा पूर्ववत करण्यासाठी नेवासा तालुक्याचेमाजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी पुढाकार घेत परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, जिल्हा नियंत्रक, अहिल्यानगर तसेच नेवासा आगार प्रमुख यांच्याशी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्याचबरोबर कुकाणा येथील रितेश भैया भंडारी यांनीही बससेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

विशेष म्हणजे, बससेवा सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत बस पुन्हा सुरू झाल्याने कुकाणा परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज बस कुकाणा बसस्थानकावर दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीने बसचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी रितेश भंडारी, कुमार देशमुख, संजय भंडारी, रज्जाक इनामदार, अण्णा पाटील गव्हाणे, नितीन निकम, सुनील पंडित, योगेश सोनवणे, गोवर्धन म्हस्के, सुनील विधाटे, जावेद तांबोळी, रफिक शेख यांच्यासह कुकाणा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…………/………/………/………./………../…………/

बससेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे कुकाणा परिसरातील नागरिकांची अहिल्यानगर, नेवासा व इतर ठिकाणी ये-जा करण्याची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील, रितेश भैया भंडारी तसेच एसटी प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले.

काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कुकाणा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रवासाची गैरसोय दूर झाली आहे. बससेवा सुरू करण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी केलेला पाठपुरावा आणि रितेश भैया भंडारी यांनी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. त्यांच्या प्रयत्नांना अवघ्या दोन दिवसांत यश मिळाले, ही कुकाणा ग्रामस्थांसाठी आनंदाची बाब आहे.

— शुभांगी कचरे, उपसरपंच, ग्रामपंचायत कुकाणा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे