Breaking
ई-पेपर

आर्ले पाटील पतसंस्थेकडून आशा स्वयंसेविकांना कर्ज वाटप

0 4 6 0 6 6

आर्ले पाटील पतसंस्थेकडून आशा स्वयंसेविकांना कर्ज वाटप **

कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

कुकाणा येथील आर्ले पाटील अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो.ली. या पतसंस्थेच्या वतीने नेवासा तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी विनातारणी ५०,०००/-रू. पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

     या योजनेची सुरुवात म्हणून तालुका समूह संघटक श्रीमती.आहेर यांच्या हस्ते आज दिनांक 19 /12/ 2024 रोजी तीन आशा स्वयंसेविकांना कर्ज वाटपाचे चेक देण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या चेअरमन सौ. मीना आर्ले यांनी नेवासा तालुक्यातील ज्या ज्या आशा स्वयंसेविकांना आर्थिक सहाय्य आवश्यक असेल त्यांनी आपल्या हक्काची पतसंस्था म्हणून संस्थेशी संपर्क करावा आम्ही त्यांना सर्वतोपरी आर्थिक सहाय्य देण्यास तयार आहोत असे आवाहन संस्थेच्या वतीने  त्यांनी केले आहे .संस्थेकडून वर्षभर सामाजिक उपक्रम तसेच समाज प्रभोधन, निराधारणा आधार देण्याचे अनेक समजउपयोगी उपक्रम राबवले जात असल्याचीं माहिती सौ. मीना आर्ले यांनी दिली.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. गणेश आर्ले पाटील व्यवस्थापक नितीन मेहेत्रे, रूपा शिंदे, कृष्णा कोलते,  श्री प्रा.सुनील गर्जे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे