Breaking
ई-पेपर

नेवासा तालुक्याचे जावई ACP निलेश देशमुख यांची पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती; वाबळे परिवारासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव*

0 8 9 9 1 8

नेवासा तालुक्याचे जावई ACP  डॉ.निलेश देशमुख यांची पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती; वाबळे परिवारासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव*

नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

एसीपी डॉ.निलेश देशमुख यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या नियुक्तीनिमित्त तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
एसीपी निलेश देशमुख हे नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरातील प्रसिद्ध उद्योजक श्री. सुनील वाबळे पाटील यांच्या परिवाराचे जावई असल्याने भेंडा, कुकाणा तसेच संपूर्ण नेवासा तालुक्यात त्यांच्या नियुक्तीबद्दल विशेष आनंद व्यक्त करण्यात आला. वाबळे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून जनसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि जनसामान्यांप्रती संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या निलेश देशमुख यांच्याकडे पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी उत्तम आरोग्य, उज्ज्वल यश आणि जनहिताच्या कार्यात अधिकाधिक यश मिळो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. नेवासा तालुक्याचे जावई म्हणून त्यांचा हा सन्मान तालुक्यासाठीही अभिमानाची बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे