Breaking
ई-पेपर

२६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटी रुपयांची मंजुरी : आ.लंघे.

0 6 0 5 1 9

२६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटी रुपयांची मंजुरी : आ.लंघे.

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

तालुक्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी २६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटींची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी केली होती.

नेवासा मतदारसंघातील पुनर्वसित गावाचे परत मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करावा यासाठी मागणी केली होती. सुरुवातीला हा आराखडा तयार केला. त्यावेळी ५० वर्षांपूर्वीच्या पुनर्वसित गावांना वगळण्यात यावे, असा निर्णय होणार होता. याबाबत आमदार लंघे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची

आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्यामुळे १९७६ पूर्वीच्या गावाचा बहिरवाडी, फत्तेपूर, प्रवरासंगम, खलाल पिंपरी, बकू पिंपळगाव, मंगळापूर, खेडले काजळी, तरवडी, उस्थळ दुमाला, भालगाव, धामोरी, गळनिंब, गोपाळपूर, रामडोह, सुरेगाव गंगा, जैनपूर, रामडोह, सुरेगाव दही, खामगाव, वरखेड, उस्थळ खालसा, बेलपांढरी, बोरगाव, बोधेगाव या गावांचा कृती आराखड्यात समावेश आहे.

भेट घेऊन १९७६ पूर्वीच्या गावांना यातून वगळू नये, अशी मागणी केली. याची दाखल घेत हा आराखडा दुरुस्त करून १९७६ पूर्वीच्या गावांचा यात समावेश करण्यात आला. यामुळे २६ गावांत अपूर्ण असलेल्या सर्व नागरी सुविधांची कामे पूर्ण होणार आहेत. अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पथदिवे यांचा यात समावेश असणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे