Breaking
ई-पेपर

*हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा उपक्रम; कुकाण्यात ईद-ए-मिलादनिमित्त खिरी-पुरीच्या महाप्रसादाचे आयोजन*

0 8 9 9 8 9

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा उपक्रम; कुकाण्यात ईद-ए-मिलादनिमित्त खिरी-पुरीच्या महाप्रसादाचे आयोजन

कुकाणा (प्रतिनिधी) : हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा जपणारा अनोखा उपक्रम कुकाणा येथे बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. ईद-ए-मिलाद निमित्त कुकाणा बाजारातळ येथे समाजबांधवांसाठी खिरी-पुरीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून धार्मिक सौहार्दाचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. कुकाणा बाजार तळ या ठिकाणी कार्यक्रम होत  आहे.कुकाणा गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि परस्पर स्नेहाची समृद्ध परंपरा अधोरेखित होत आहे.

या कार्यक्रमास सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७:00वाजता होणार आहे.

या उपक्रमाचे आवाहन अहले सुन्नत वल जमात-जामा मशीद, कुकाणा यांच्या वतीने करण्यात आले असून, मौलाना शमशाद पठाण यांनी सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कुकाणा येथे विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा जपण्याची परंपरा असून, ईद-ए-मिलादनिमित्त होणारा हा उपक्रम ‘एक गाव, एक परिवार’ या भावनेला बळ देणारा ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे