भेंडा जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या आयडीयल सेंटरचे उदघाटन..
जिल्हा परिषद शाळा आणि घुले पाटील शिक्षण संस्थेबद्दल सर्वांनाच आत्मीयता- पुजा शिंदे
भेंडा जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या
आयडीयल सेंटरचे उदघाटन..
*जिल्हा परिषद शाळा आणि घुले पाटील शिक्षण संस्थेबद्दल सर्वांनाच आत्मीयता- पुजा शिंदे
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
:– जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली आणि श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेत पूर्ण झाले.
जिल्हा परिषद शाळा आणि घुले पाटील शिक्षण संस्थेबद्दल सर्वांनाच आत्मीयता असल्याचे प्रतिपादन
क्लास वन अधिकारी कु.पुजा शिंदे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या
आयडीयल सेंटरचे (डिजिटल कॉम्प्युटर लॅब) उदघाटन पुजा शिंदे यांचे हस्ते झाले,त्यावेळी ती बोलत होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शिक्षणविस्तार अधिकारी मीरा केदार,
भारत साबळे,गणेशराव गव्हाणे, नामदेवराव निकम,नामदेव शिंदे,अजित रसाळ,प्रा.भारत वाबळे,डॉ.संतोष फुलारी,व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप फुलारी,ग्रामविकास अधिकारी रेवणनाथ भिसे,मुख्याध्यापक रामभाऊ गवळी,सुधाकर पालवे,पावलस गोर्डे
मुख्याध्यापक संजय कडूस व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी क्लास वन अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल पुजा शिंदेचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कु.शिंदे पुढे म्हणाल्या की, ज्यांच्या हाताला धरूनच पहिला धडा गिरवला त्यांचाच हाताने माझा सत्काराचा योग आज आला.त्यामुळे आयुष्याचा एक सर्कल पूर्ण झालं सारख वाटतय.
घुले पाटील शिक्षण संस्थेत शिक्षणाच्या सर्व सुविधा निर्माण झालेल्या आहेत,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा.या संस्थेत काही काळ मला अध्यापनाचे काम करण्याची संधी मिळाली. शिक्षण क्षेत्रातुन प्रशासकीय क्षेत्रात जाण्याचा योग आला. आजची मुले
राईजिंग इंडियाचे उगवते तारे आहेत. कोणत्याही क्षेत्रात जाण्याचे स्वप्न बघून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा.
या शाळेत सुसज्ज डिजीटल लॅब तयार झालेली आहे,तीचा सुयोग्य वापर करा, चांगली पुस्तके वाचा आणि आई-वडिलांचे ऐका असा सल्ला तीने उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
मीरा केदार म्हणाल्या की, मुलांचा सर्वांगीण विकास हा फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच होत असतो.पुजा ही प्राथमिक शाळेची आणि माझी विद्यार्थिनी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
दत्तात्रय काळे म्हणाले,शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, त्यामुळे शिका, मोठे स्वप्न बघा आणि यशस्वी व्हा.
पालक अर्चना मिसाळ म्हणाल्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ते द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करून उंच भरारी घ्यावी.
मुख्याध्यापक संजय कडूस यांनी
प्रास्तविक केले,ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून या डिजिटल लॅब करिता ३० लाख रुपयांचा निधी मिळाला. एका वेळेत २४ विद्यार्थी कॉप्युटरवर बसू शकतात.सर्व विषयांचे सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर यात आहेत.
कार्यक्रमास शिक्षिका हिरा पोंधे,रेखा फंड ,मंगल मुळे , सुनिता माळशिखरे , संगिता नळे,शिक्षक हरिश्चंद्र ठोंबरे, तारांचंद कोकाटे,विजय तवार,सुरेश तळेकर, ज्ञानेश्वर गोरे,सचिन बेळगे यावेळी उपस्थित होते.
शिक्षक कानिफनाथ दौंड यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका निलेशा घुणे यांनी आभार मानले.




