कुकाणा जिल्हा परिषद शाळेत मोफत पाठयपुस्तकांचे वाटप
शालेय व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांचे स्वागत...

कुकाणा जिल्हा परिषद शाळेत मोफत पाठयपुस्तकांचे वाटप
शालेय व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांचे स्वागत…
कुकाणा प्रतिनिधी –
कुकाणा जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने तसेच ग्रामपंचायत कुकाणा सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत नवगत पहिलीच्या तसेच सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्याच बरोबर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मोफत पठ्य पुस्तके तसेच शाळेच्या गणवेशाचे वाटप प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच लताताई अभंग या होत्या या वेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर उपसरपंच शुभांगी कचरे,आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी शिवाजीराव भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष पत्रकार सोमनाथ कचरे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष देविदास गरड, उपाध्यक्ष महेश सदावर्ते शालेय कमिटी सदस्या वैशाली देशमुख, अरुण फोलाने, मयुरी हांडे, शरद कावरे,ज्ञानदीप देशमुख आदी व्यासपीठावर होते तर प्रसंगी
केंद्रप्रमुख लाटे यांनी पाहुण्यांचे आभार मानले तर प्राचार्या साठे मॅडम यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले तसेच राठोड सर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सर्व शिक्षक व पालकमोठया संख्येने उपस्थित होते.