Breaking
ई-पेपर

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तांबे यांचा शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश..

0 6 0 5 2 1

सामाजिक कार्यकर्ते तसेच केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तांबे सर यांचा adv शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश…..

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील रहिवासी असलेले अशोकराव तांबे सर यांचा आज शेतकरी संघटनेमध्ये प्रदेश अध्यक्ष adv. अजितराव काळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश .

या वेळी अशोकराव तांबे सर बोलताना म्हणाले की मी आज एडवोकेट अजितराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेत प्रवेश करत आहे .

पुढील काळामध्ये शेतकरी संघटनेचे काम प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत तसेच तळागाळातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तसेच शेतकरी संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे तांबे सरांनी बोलताना सांगितले. तसेच ते बोलताना म्हणाले की एडवोकेट काळे साहेबांचे शेतकऱ्यांसाठी खूप मोठे मोलाची योगदान आहे त्यांची शेतकऱ्यांसाठी असणारी तळमळ व त्यांचा न्यायालयीन लढा मी नेहमी पाहत आलेलो आहे त्यातूनच मला मी संघटनेमध्ये काम करण्या इच्छा निर्माण झाली म्हणून मी आज शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत असून यापुढे शेतकरी संघटना वाढीसाठी रात्र झटणार असल्याचे अशोकराव तांबे यांनी बोलताना सांगितले.

अशोकराव तांबे सर यांचा शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांचा शेतकरी संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

हा प्रवेश नेवासा येथील शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यालय येथे झाला. या पक्ष प्रवेश प्रसंगी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधीतज्ञ अजित काळे, संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव काळे मेजर नेवासा तालुका वकील संघाचे उपअध्यक्ष एडवोकेट सुदाम ठुबे, शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब तुवर,शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नावगडे, नेवासा तालुका कायदेशीर सल्लागार एडवोकेट कावळे भाऊसाहेब, कायदेशीर सल्लागार एडवोकेट शिरसाठ भाऊसाहेब, समर्पण फाउंडेशन चे संस्थापक व अध्यक्ष करणसिंह घुले, नेवासा तालुका शेतकरी संघटना सचिव किरण लंघे, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय निकम, संपर्कप्रमुख विश्वास मते सोमनाथ औटी तसेच शेतकरी संघटनेचे अदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे