Breaking
ई-पेपर

*आदर्श सौंदाळा शाळेला आमदार विठ्ठलराव लंघे यांची भेट; दोन वर्गखोल्यांचे आश्वासन*

0 8 9 9 6 5

*आदर्श सौंदाळा शाळेला आमदार विठ्ठलराव लंघे यांची भेट; दोन वर्गखोल्यांचे आश्वासन*

नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यात आदर्श ठरलेल्या मौजे सौंदाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सदिच्छा भेट देत शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
शाळेतील वाढती विद्यार्थीसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचे आश्वासन आमदार लंघे यांनी दिले. ही माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली.
यावेळी आमदार लंघे म्हणाले, “सौंदाळा हे राज्यात आदर्श ठरलेले गाव असून येथील शाळाही गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे आदर्श बनली आहे. या शाळेत मुलांना प्रवेश मिळावा म्हणून अनेक पालक माझ्याकडे विनंती करतात. यावरूनच येथील शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांचे समर्पण अधोरेखित होते. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.”
यावेळी आमदार लंघे यांनी एका वर्षात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान, आदिशक्ती अभियान आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे तीन मानाचे पुरस्कार मिळविल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे व ग्रामपंचायत अधिकारी सौ. प्रतिभा पिसोटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ग्रामपंचायतीच्या विकासाभिमुख कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक अशोक पंडित यांनी केले, तर मुख्याध्यापक पोपट घुले यांनी आभार मानले.
यावेळी केंद्रप्रमुख सीताराम आरगडे, बाळासाहेब आरगडे, सचिन आरगडे, बंडू आरगडे, मंजू आढागळे यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार लंघे यांच्या भेटीमुळे व दोन नवीन वर्गखोल्यांच्या आश्वासनामुळे शाळेच्या विकासाला नवी गती मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी अधिक दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे