गरड यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वितरण..
गरड यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वितरण..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद प्राथमिक कुकाणा शाळेत भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच संविधानाचे वाचन करून भारतिय संविधान दिन साजरा करण्यात आला.
त्याच बरोबर माजी विद्यार्थीसंघाची स्थापना करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या प्रसंगी झाला, या कार्यक्रमात
शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष देविदास गोविंदराव गरड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेचे आयोजन केले असल्याने शंभर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना सुका मेवा बदाम काजू आणि फळे या निमित्ताने खाऊंचे वाटप या वेळी गरड यांनी केले. प्रसंगी व्यासपीठावर
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच एकनाथराव कावरे होते तर प्रमुख पाहुणे जेष्ठ नागरिक विष्णुपंत पवार माजी सरपंच मार्केट कमिटीचे संचालक दौलतराव देशमुख, मा. उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, मा उपसरपंच बाळासाहेब कचरे,पत्रकार संघांचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कचरे, ,उपाध्यक्ष महेश सदावर्ते, कांतामामा दरंदले, पत्रकार अनिल गर्जे सर, आण्णा कावरे सर, मछिंद्र कावरे, भानुदास कावरे,प्रशांत उंडे, पांडुरंग कावरे, आप्पासाहेब कावरे, शरदभाऊ गरड, राजूभाऊ गरड, इनामदार सर, अजीमभाई सय्यद, जाबीर शाह
उपस्थित होते.
या वेळी विष्णुपंत पवार म्हणाले मुलांच्या संस्काराच्या दृष्टीने गरड यांनी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा असे उपक्रम करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होतील या साठी प्रयत्न करावे तसेच देविदास गरड म्हणाले बाल मनावर विद्यार्थी दशेत उत्तम संस्कार व्हावेत या उद्देशाने आपण असे उपक्रम राबवत असून याची व्याप्ती वाढावी म्हणून माजी विद्यार्थी यांना सोबत घेऊन शाळेचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे गरड म्हणाले. रज्जाक इनामदार अण्णासाहेब कावरे आदिनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी अध्यक्ष व समितीचे विद्यमान सदस्य सोमनाथ कचरे यांनी केले तर सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले.आभार शिक्षक सतीश चाबुकस्वार यांनी मानले.




