*लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी डॉ. क्षितिज घुले पाटील व रवींद्र नवले यांची नियुक्ती*

*लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी डॉ. क्षितिज घुले पाटील व रवींद्र नवले यांची नियुक्ती*
नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने तज्ज्ञ संचालकपदी डॉ. क्षितिज नरेंद्र घुले पाटील आणि रवींद्र काशिनाथ नवले पाटील यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे कारखान्याच्या प्रशासनात अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि प्रभावी नियोजनाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना सभासद व कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
शुक्रवार (दि. १० जुलै) रोजी कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी शेवगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्य करताना ग्रामीण विकास, शेती आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तर रवींद्र नवले यांनीही सहकार क्षेत्रातील अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या दोघांच्या नियुक्तीमुळे कारखान्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बैठकीस माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, संचालक पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, डॉ. नारायण म्हस्के, जनार्धन कदम, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अॅड. हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे, संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, काशिनाथ नवले, दत्तात्रय काळे, अशोक तानवडे यांच्यासह कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार ए. बी. खरड, एम. एस. मुरकुटे, एस. डी. चौधरी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार असून, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.



