अबॅकस म्हणजे बुद्धीचा कस : – ॲड. हिम्मतसिंह देशमुख.
विविध शालेय स्पर्धा मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..

अबॅकस म्हणजे बुद्धीचा कस : – ॲड.
हिम्मतसिंह देशमुख.
विविध शालेय स्पर्धा मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..
कुकाणा प्रतिनिधी- विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास करत असताना त्यात शिक्षणा बरोबर योग्य संस्काराची जोड दिल्यास येणाऱ्या काळात आपली पुढची पिढी सुद्धा संस्कारी होईल व चांगले नागरिक होतील, जी स्टार प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लास व जी स्टार कोचिंग क्लासेस हे मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण देऊन मार्गदर्शन करत आहे ही बाब कौतुकास्पद असून,
अबॅकस म्हणजे बुद्धीचा कस असल्याचे ॲड.
हिम्मतसिंह देशमुख.हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जी स्टार प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लास व जी स्टार कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने कुकाणा येथे MGO(Math genius olympiad),Nmms, अबॅकस, नवोदय, स्कॉलरशिप अशा विविध शालेय स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवाऱी सकाळी कुकाण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संपन्न करण्यात झाला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधीतज्ञ श्री ॲडवोकेट हिम्मतसिंह देशमुख हे अध्यक्षस्थानी होते.त्याचबरोबर व्यासपीठावर सौ लताताई अभंग,
युवा नेते अब्दुल भैया शेख ,पत्रकार सुनील पंडित सर , विलासराव देशमुख ,पत्रकार सोमनाथ कचरे पाटील, सरपंच मा उपसरपंच आत्माराममामा लोंढे श्री गोरक्षनाथ लोंढे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर जी स्टारचा विद्यार्थी सर्वेश सचिन सदावर्ते यानेही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी स्टार क्लासेसच्या संचालिका सौ मनीषा जयदीप लोंढे यांनी केले ,त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश घुले यांनी केले तर संचालक जयदीप लोंढे यांनी मान्यवरांचे ,पालकांचे, विद्यार्थ्यांचे आभार मानले .