प्रशासकीय अधिकाराच्या सह आमदार लंघे हे नुकसानग्रस्त शेतकऱ्याची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करून दिले संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामेचे आदेश……

प्रशासकीय अधिकाराच्या सह आमदार लंघे हे नुकसानग्रस्त शेतकऱ्याची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करून दिले संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामेचे आदेश……
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
देडगाव ,पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे येथील गहू ,केळी,कांदा नुकसानग्रस्त पिकाची पाहणी आज आमदार लंघेनी केली. तसेच राहु रामदास कांदे यांचे वाऱ्याने मोठे बोरीचे झाड कोसळून जनावराच्या शेड वरती पडले सुदैवाने कोणतीही जीवित आणि यामध्ये झाली नसेल जनावराची संरक्षण भिंत तसेच वरील पत्रे याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाहूर वाघ नावाच्या शेतकऱ्याची वीज पडून एक म्हस ही मृत्यू पडली आहे त्याची पाहणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केली.
याप्रसंगी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे , नवनाथ साळुंके ,अंकुश काळे,नुकसानग्रस्त शेतकरी तसेच शासकीय अधिकारी म्हणून नेवासा तालुक्याचे तहसीलदार संजय बिराजदार, बी.डि.ओ लखवाल साहेब, कृषी सहाय्यक रुपेश पवार, प्रांताधिकारी सुधीर पाटील ,सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माळी साहेब, कृषी अधिकारी हिरवे साहेब, आदी प्रशासकीय अधिकाऱ्यां सह आमदार लंघे यांनी नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व पंचनामा करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.
आ. लंघे बोलताना म्हणाले की या भागामध्ये कांद्याचे तसेच केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कांद्याचे तसेच केळीचे या तीन गावांमध्ये सरसकट पंचनामे करावेत असे आदेश आमदार विठ्ठलराव लंघे तहसीलदार, बी.डि.ओ प्रांताधिकारी यांना दिले असल्याचे बोलताना सांगितले. आमदार लंघे यांनी अधिक माहिती एस.नाईन.मीडियाशी बोलताना दिली.