Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

किड्स किंग्डम, कुकाणा विद्यालयात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी..

0 6 0 5 1 9

किड्स किंग्डम, कुकाणा विद्यालयात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी..

कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

किड्स किंग्डम, कुकाणा विद्यालयात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली.नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सर्वात प्रथम साजरा करण्यात येणारा सण आहे. विद्यार्थ्यांनी फुगडी झोका असे पारंपारिक खेळ खेळून त्याचा आनंद घेतला.
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो. या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते. नागपंचमीचे महत्व आणि मान्यता
हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो.अशी माहिती शिक्षिका अनिता बडे यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमी या सणाबद्दल दिली.या प्रसंगी प्रतिभा कदम,सोनाली जामदार,कोमल म्हस्के, पूजा पवार आदी शिक्षिका कर्मचारी सहभागी होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे