Breaking
ई-पेपर

*ओम शांती केंद्राकडून भेंडयात चैतन्य देवी दर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण*

0 9 5 0 2 3

*ओम शांती केंद्राकडून भेंडयात चैतन्य देवी दर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण*

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथे नवरात्रोउत्सवानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय नेवासा केंद्राचे वतिने चैतन्य देवी दर्शनाचा कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आला.

भेंडा खुर्द लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात शुक्रवार दि.१६ रोजी रात्री
झालेल्या या संगीत संध्या चैतन्य देवीच्या दर्शन कार्यक्रमाचे उदघाटन
नेवासा केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी सरला दीदीजी व ब्रह्माकुमारी वंदना दीदीजी यांच्या प्रमुख उपस्थितित माजी संचालिका रत्नमाला नवले,सरपंच वर्षा नवले,समिक्षा महापुर, पुष्पाताई भागवत,
सोनाली चौधरी, कविता नवले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले.

या चैतन्य देवी दर्शनाचा कार्यक्रमात
ऋतुजा परदेसी हिने श्री महालक्ष्मी देवी,समृद्धी दीदी यांनी श्री संतोषी माता देवी,सृष्टी साळुंके हिने श्री सरस्वती देवी,साक्षी लहिरे हिने श्री दुर्गादेवी, मनीषा पिंपळेहिने श्री तुळजा भवानीदेवी,सुनीता पवार यांनी श्री कालिकादेवी व ब्रह्मकुमारी वंदना दीदी यांनी “ब्रह्मकुमारी-ज्ञानगंगा” या देविंची रुपे साकारली. आकर्षक वेशभूषा व लाईट इफेक्ट मुळे साक्षात नवदुर्गा भूतलावर अवतारल्याचा आभास निर्माण झाला होता. या कार्यक्रमाला भेंडडा खुर्द ग्रामस्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राहुरी येथील ब्रह्माकुमार संदीपभाई व कांचन पवार यांनी “आई जगदंबे…. या गीतावर सुंदर नृत्य प्रस्तुत केले.

नेवासा केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी सरला दीदीजी व ब्रह्माकुमारी वंदना दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सिद्धांत सीड्सच्या संचालिका मिराताई नवले,
मनिषा चौधरी,निता शिंदे, जनाबाई धनवडे, सुनिताताई वाघडकर, वैष्णवी भोसले, कमल काजळे, चंद्रकला गडकर,पद‌मबाई नवले, रूपाली गणेश नवले,सुवर्णा नवले, आबाई नवले, मिना शिंदे, जया शिंदे, इंदुबाई बावीस्कर, रेखा चौधरी, संगिता नवले, वैशाली नवले, सोपानराव नवले, रामकृष्ण नवले, माजी प्राचार्य बाळासाहेब पंडित, वैभव नवले,सुभाष चौधरी,किशोरभाई नवले, लहानू चौधरी, वाघमारे, नानासाहेब चौधरी, बबन नवले, नवनाथ नवले, बबन पालवे, कृष्णा नवले, बाळासाहेब पिटेकर, सिताराम नवले, योगेश शिंदे,
यांचेसह नेवासा व भेंड्यातील साधक यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे