Breaking
ई-पेपर

प्रभाकर शिंदे यांना कृषी सन्मान पुरस्कार

0 4 6 2 2 1

प्रभाकर शिंदे यांना कृषी सन्मान पुरस्कार

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

महाविद्यालयाचा कृषी सन्मान पुरस्कार पंचगंगा समूहचे अध्यक्ष प्रभाकर उत्तमराव शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी रोजी कृषी महाविद्यालय पुणे येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत चंद्रकांत दादा पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. नेवासा तालुक्यातील खुपटी या छोट्या गावातून सुरू झालेला शेतकरी कुटुंबातील प्रभाकर शिंदे यांचा प्रवास अतिशय खडतर आणि प्रेरणादायी आहे. १९९६ ला बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी नेवासा शहरात कृषी सेवा केंद्राचा छोटा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे कांदा बियाणे प्रक्रिया उद्योग छोट्या प्रमाणावर सुरू केला. या व्यवसायात चांगले यश मिळाल्यानंतर वाळुज एमआयडीसी येथे आठ एकर परिसरात मोठा अत्याधुनिक बियाणे प्रक्रिया उद्योग सुरू केला. आज भारतातील जवळपास १४ पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्यांचे विविध प्रकारचे बियाणे विकले जाते. भारतातील कांदा बियाणे प्रक्रिया उद्योगात क्रमांक तीन नंबरचे उत्पादन पंचगंगाचे आहे. सर्वच भाजीपाला आणि डाळवर्गीय पिकांमध्ये पंचगंगा बियाणांचे नाव अग्रेसर आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे