Breaking
महाराष्ट्र

भानसहिवरा जि प शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा इधाटे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

0 6 0 5 0 8

भानसहिवरा जि प शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा इधाटे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

भेंडा – ( प्रतिनिधी ) नामदेव शिंदे

नेवासा तालुक्यातील
भानसहिवरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . सुनंदा बेलनाथ इधाटे या छत्तीस वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवापूर्ती सोहळा शिवमल्हार मंगल कार्यालय भानसहिवरे येथे आयोजित करण्यात आला होता . सुनंदा इधाटे व पती कारभारी धोंडीराम पेहेरे या दांम्पत्याचा महंत सुनील गिरी महाराज व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते सन्मान केला . या प्रसंगी शिर्डी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे माजी सरपंच अशोकशेठ बोरा, एकनाथ धानापुणे, भानसहिवरा गावच्या सरपंच – मीनाताई जोजार व माजी सभापती किशोर जोजार नेवासा तालुका गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड तसेच विस्तार अधिकारी. धिंदळे केंद्रप्रमुख श्री सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक भोईटे डॉ. संतोष ढवण, डाॅ. जगन्नाथ नरवडे, मुख्याध्यापक – रंगनाथ गुंजाळ व शाळेतील सर्व सहकारी शिक्षकवृंद व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन – रामेश्वर चोपडे, रोहकले गुरुजी, राजू मुंगसे गोसावी , श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन – जयकुमार चेंगडे आदी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर लेझीम सादरीकरण केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व तसेच उपस्थितांना गोड जेवण इधाटे यांचे कडून दिले गेले. यावेळी वर्षा शेटे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली, कन्या प्राजक्ता क्षीरसागर यांनी आईस पत्र याद्वारे आई विषयीच्या भावना अतिशय उत्तम रीतीने सादर केल्या, तसेच नातू ईशान क्षिरसागर यानेही आपले बाल मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रांगोळी कार रवी महागावे यांनी सुंदर रांगोळीचे रेखाटन केले. होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवन्नाथ पवार यांनी तर आभार नेवासा पं सं माजी उपसभापती किशोर जोजार यांनी मानले.( छाया – नामदेव शिंदे )

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे