Breaking
ई-पेपर

हिंदू-मुस्लींम बांधवांचं प्रतीक म्हणून अनवरवली बाबा ,चंदू बाबा, गुलजार बाबा, यांचा हा उरुस तालुक्यात नवलौकिक    : – आमदार लंघे

0 6 0 5 3 3

हिंदू-मुस्लींम बांधवांचं प्रतीक म्हणून अनवरवली बाबा ,चंदू बाबा, गुलजार बाबा, यांचा हा उरुस तालुक्यात नवलौकिक      : – आमदार लंघे

 

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

हिंदू मुस्लिम धर्माचे प्रतीक असलेले जळका येथील अनवरवली बाबा , चंदू बाबा ,गुलजार बाबा यांच्या ऊरसाला आज प्रारंभ झाला या ऊरसाच्या प्रारंभ प्रसंगी आज पहिल्या दिवशीच्या चादर मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकी मध्ये शोभेची दारू तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये ही मिरवणूक करण्यात आली होती.

मिरवणुकीच्या अनुषंगाने नेवासा तालुक्याचे नवनिर्वाच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन अनवरवली बाबा ,चंदू बाबा, गुलजार बाबा ,यांच्या तवकर पिराचे दर्शन घेतले व समस्त जळकागाव ग्रामस्थांना यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा आ.लंघेंनी दिल्या.

आ. लंघे बोलताना म्हणाले की हिंदू- मुस्लिम धर्मियांचे लोक एकत्रितपणे येऊन हा यात्रा उत्सव साजरा करतात तसेच हा यात्रा उत्सव हिंदू-मुस्लिम बांधवांचे प्रतीक म्हणून नेहमीच मी पाहत आलेलो आहे यामुळे गावातील एकोपा वाढला जातो या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतात त्यामुळे गावातील एकोप्याचे दर्शन या माध्यमातून तालुक्याला होते याचा आदर्श जळकागाव आहे येथे येण्याचे भाग्य मला मिळाले असे आमदार लंघे बोलताना म्हणाले.

यात्रा उत्सवाच्या भेटीदरम्यान आ. विठ्ठलराव लंघे पुढे बोलताना म्हणाले की अन्वरवलीबाबा, चंदू बाबा, गुलजार बाबा ,यांचा यात्रा उत्सव पुरातन काळापासून चालत आलेला उत्सव आहे हा यात्रा उत्सव म्हणजे हिंदू-मुस्लिम बांधवांचे व धर्मीयांचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा यात्रा उत्सव आहे यात सर्व धर्मीय जळका ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात तसेच आसपासच्या गावातील ग्रामस्थ ही उत्सवासाठी मोठ्या संख्येने एकोप्याने एकत्र येतात ही आनंदाची बाब आहे असे आमदार लंघे पाटील बोलताना म्हणाले. आमदार लंघें हे यात्रा उत्सवाच्या सदिच्छा भेटीदरम्यान बोलत होते.

तसेच अनवरवली बाबा चंदू बाबा गुलजार बाबा हे अनेकांच्या नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते त्या अनुषंगाने नेवासा तालुका भरातूनच नव्हे तर जिल्हाभरातून या यात्रा उत्सवासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

या यात्रा उत्सव दरम्यान खेळण्याचे दुकाने, सौंदर्य प्रसाधनाची दुकाने, खाऊचे दुकाने, आदी दुकानांमुळे या यात्रा उत्सवाला शोभा आली आहे तसेच यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे , महिलांसाठी सौंदर्यप्रसाधनाची दुकाने, तसेच खाऊच्या दुकाने, प्रसादाच्या दुकाने यात्रा उत्सव मध्ये मोठ्या थाटामाटात पहावयास मिळत आहे.

या यात्रा उत्सवाच्या दरम्यान चादर मिरवणूक, छबिना, शोभेची दारू तसेच लोकनाट्य तमाशा आदि गोष्टींचा समावेश यामध्ये केला जातो तसेच प्रामुख्याने बैलगाडा शर्यत ही या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी भरवली जाते .

अनवरली बाबा ,चंदू बाबा ,गुलजार बाबा यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे जळका गावाला मोठी रोशनाई आल्याचे पहावयास मिळत आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने व यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी अंकुश काळे ,भास्कर चिमणे, दिलीप चावरे, भाऊसाहेब जगदाळे ,अशोक शिंदे, माऊली वाघमारे, सुनील वाघमारे, बाळासाहेब सोनवणे, सरपंच राजेंद्र पंडित ,बाळासाहेब शिंदे, अब्दुल पठाण ,महेश परदेशी, अक्सर पठाण हरिभाऊ अढागळे, प्रदीप सोनवणे बाबुलाल चावरे, अमोल पठाडे ,अश्फाक पठाण आदी जळका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे