कुकाणा येथे किड्स किंगडम विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ….
कुकाणा येथे किड्स किंगडम विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ….
कुकाणा प्रतिनिधि / – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
कुकाणा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पुष्पहार घालून
किड्स किंगडम विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. , विद्यालयात बाळगोपाळांनी इतिहास कालीन पोशाख परिधान केलेला तसेच वेगवेगळ्या ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थ्यां लक्षवेधून घेणारे ठरले , शिवजयंती निमित्ताने शाळेचे प्रांगणात विद्यार्थ्यांनी
अप्रतिम नृत्य सादर केले तर सार्थक सावंत, आनंदी मंडलिक, अथर्व राऊत ,ओवी मिसाळ ,अभिमन्यू अरगडे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे वर्णन करत इतिहासातील घटनाना भाषणातून उजाळा दिला .प्रसंगी अविरा मुरकुटे हिने शिवगर्जना करून शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका अनिता बडे, प्रतिभा कदम,रोहिणी सरोदे , पूजा पवार,वैष्णवी कदम शिक्षक आदी शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




