*जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील पल्स पोलिओ मोहिमेची केली पाहणी*
*जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील पल्स पोलिओ मोहिमेची केली पाहणी*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त नेवासा तालुक्यातील कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी भेट देऊन मोहिमेची पाहणी केली. यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रावरील व्यवस्थेची तपासणी करत आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. पुंड यांनी प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओची लस पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले.या वेळी
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर, डॉ. कैलास कानडे, डॉ. संध्या करडे, यावेळी आरोग्य निरीक्षक धर्मनाथ पालवे, अनिल पचारणे, संदीप थोरात, नलिनी साबळे, वैशाली बनसोडे, नीता पोपळघट, विशाल गायकवाड, भीमराज लवांडे, साक्षात सारवान तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका कर्मचारी उपस्थित होते.केंद्रातील लसीकरणाची व्यवस्था, नोंदवही व आवश्यक सुविधा याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी समन्वयाने काम करून शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



