Breaking
ई-पेपर

*मुळा साखर कारखाना निवडणुकीत मीराबाई दिवटे यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा*

0 8 9 9 1 8

*मुळा साखर कारखाना निवडणुकीत मीराबाई दिवटे यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा*

सोनई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला राखीव मतदारसंघातील उमेदवार श्रीमती मीराबाई भाऊसाहेब दिवटे (भानसहिवरे) यांनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
श्रीमती दिवटे यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य न झाल्याने त्यांची उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या कायम राहिल्याचेही त्यांनी सांगितले.
मुळा सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या हितासाठी केलेला विकासाभिमुख व सकारात्मक कारभार लक्षात घेऊन आपण सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिला राखीव मतदारसंघातील सहकार पॅनलच्या उमेदवार सौ. कमल चांगदेव दहिफळे व सौ. विमल नारायण सोनवणे यांच्यासह पॅनलमधील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले.
दि. २६ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात मतदारांनी स्वतःला मतदान न करता सहकार पॅनलच्या उमेदवारांना ‘बॅट’ चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करावे व त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याची प्रगती आणि सभासदांचे हित जपण्यासाठी सहकार पॅनलला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे मत श्रीमती मीराबाई दिवटे यांनी व्यक्त केले.
यावेळी वसंतराव सोनवणे, राम सोनवणे, आबासाहेब सोनवणे, संदीप पटारे, शरदराव सोनवणे, वैभव दिवटे, महेश भणगे आदी उपस्थित होते.

4/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे