Breaking
ई-पेपर

*विभागीय ‘अँग्रोवन सरपंच महापरिषद २०२६’साठी प्रमोद गजभार पाटील यांची निवड; तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव*

0 8 9 9 8 9

*विभागीय ‘अँग्रोवन सरपंच महापरिषद २०२६’साठी प्रमोद गजभार पाटील यांची निवड; तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव*

नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय ‘अँग्रोवन सरपंच महापरिषद २०२६’ या प्रतिष्ठित परिषदेसाठी नेवासा तालुक्यातील प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच प्रमोद गजभार पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नेवासा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामविकास, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या परिषदेसाठी निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे. ग्रामीण भागातील विकासाच्या विविध संकल्पना, शाश्वत शेती, जलव्यवस्थापन, ग्रामपंचायत प्रशासन, डिजिटल गाव, स्वच्छता आणि ग्रामविकासाच्या नव्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत सखोल मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.
ही विभागीय अँग्रोवन सरपंच महापरिषद शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ५.०० या वेळेत डेक्कन कॉलेज सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील आदर्श सरपंच, ग्रामविकास क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
प्रमोद गजभार पाटील यांच्या निवडीचे नेवासा तालुक्यात सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, अनेक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सहभागामुळे नेवासा तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान संपूर्ण नेवासा तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे