*त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल तेलकूडगाव येथे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न*

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल तेलकूडगाव येथे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
नेवासा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.गौरव आमले पाटील उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर मा.जिल्हा परिषद सदस्या विजयाताई अंबाडे ,अर्चना अंबाडे,तेलकुडगावचे
सरपंच सतिषराव काळे,तेलकूडगाव सेवा सोसायटी चे नवनियुक्त चेअरमन
अशोक काळे,कारखान्याचे संचालक मच्छिंद्र म्हस्के,काकासाहेब काळे,अरविंद घाडगे, लक्ष्मण काळे,अरुणपाटील घाडगे, शरद काळे,बाबुराव काळे,शिवाजी घोडेचोर,सुरेश काळे,विलास काळे,नामदेव अण्णा घोडेचोर,महेश काळे, सखाराम काळे, बालकनाथ काळे, भानुमामा गटकळ, म्हातारदेव काळे,सिताराम घोडेचोर, काकासाहेब घोडेचोर, भाऊसाहेब शेंडगे, मधुकर घाडगे सर,कडूबाळ तेलधूणे, ज्ञानेश्वर काळे साईनाथ काळे, शिवाजी काळे, हरीभाऊ काळे,सोमनाथ दळे, श्रीकांत पोळ, संदीप चाबुकस्वार,भरत उगले, सिद्धार्थ भातपुडे ,भरत भातपुडे, भाग्यश्री मगरे,हभप अमोल महाराज घाडगे,हभप महेश महाराज घाडगे, चंद्रकांत गुगळे,प्रशासिका मनीषा राऊत, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर विद्यालयाचे सैनिकी प्रशिक्षक मेजर बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील बालसैनिकांनी राष्ट्रध्वजाला परेड संचलनाद्वारे मानवंदना दिली.
त्यानंतर कराटे प्रशिक्षक अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाल सैनिकांनी कराटे,ज्युदो, लाठी-काठी,नाईन -चाकू, दांडपट्टा आदींची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनींनी देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य सादर केले.

याप्रसंगी विद्यालयातील विविध परीक्षा व खेळांच्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, मेडल देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तेलकुडगावचे ग्रामस्थ व पालक संजय दिनकर साळवे यांनी जाहीर केल्याप्रमाणे बोर्ड परीक्षेत इयत्ता दहावी व बारावी- विज्ञान आणि कला या वर्गासाठी बोर्ड परीक्षेत विद्यालयात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षिस स्वरूपात तर व्यंकटेश मल्टिस्टेट पतसंस्थेच्या वतीने स्मृती चिन्ह प्रमुख अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गौरव आमलेपाटील यांनी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी जिज्ञासू असावे,आहार व आरोग्याची काळजी घ्यावी,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी तेलकूडगाव सारख्या ग्रामीण भागात तयार व्हावा त्यासाठी आवश्यक ती सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना देत शाळेच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी चांदा गटातील मा.जिल्हा परिषद सदस्या विजयाताई अंबाडे यांनी बोलताना आपल्या मनोगतातून घाडगे पाटील व त्रिमूर्ती परीवाराच्या दूरदृष्टी व कर्तृत्वाचे कौतुक करताना ग्रामिण भागात शिक्षणाची गंगा आणल्याबद्दल आभार व्यक्त केले. योग्य मार्गदर्शन व प्रेरणेच्या बळावर त्रिमूर्ती सारख्या ग्रामिण भागातील विद्यालयाचा पियुष सारखा विद्यार्थी निट सारख्या अवघड परीक्षेत देश पातळीवर डंका वाजवतो हे अभिमानास्पद आहे ,स्वातंत्र्यदिनी विविधते तील एकतेचे महत्वही त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.

याप्रसंगी मा.सरपंच रेवणनाथ काळे व विद्यालयाचा निट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पियुष अंबाडे,इयत्ता नववी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी संचिता फलके,रुद्र काळे ,समर्थ घोडेचोर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे विभाग प्रमुख शरद कराड यांनी केले.सूत्रसंचालन जयश्री भांगे व रेणुका काळे यांनी केले तर आभार विद्यालयाच्या प्रशासिका मनीषा राऊत यांनी मानले. याप्रसंगी या शैक्षणिक वर्षात बोर्ड परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना काॅफीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली.खाऊ वाटप झाल्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेलकूडगाव संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



