कृषी खात्याचचे वराती मागून घोडे पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे परमिट वाटप चालू शेतकऱ्यांची कृषी खात्याकडून कृर थट्टा?
कृषी खात्याचचे वराती मागून घोडे पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे परमिट वाटप चालू शेतकऱ्यांची कृषी खात्याकडून कृर थट्टा?
नेवासा प्रतिनिधी – मंगेश निकम
नेवासा तालुक्यातील कृषी खात्याचा अजब अगब कारभार पहावयास मिळत आहे पाऊस होऊन एक महिना उलटून गेला त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पिकामध्ये पेरणी केली आहे आता पेरलेली बियाणे उगवून निघाली तसेच खुरपणी, खत ,घालने हा एक महिन्याचा कालावधी त्यामध्ये निघून गेला त्यानंतर कृषी खात्याने सोयाबीन, व मका याचे परमिट वाटण्याचे काम सुरू केली ही क्रूर थट्टा? असा प्रश्न उपस्थित झाला असून
कृषी खात्याकडून सलाबतपुर शाखेच्या अधिकाऱ्याकडून केली जात आहे. त्यांनी ही माहिती आपल्या मोबाईल स्टेटस वर शेतकऱ्यांना दिली आहे. त्यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली असती त्यांनी सांगितले की शासनानेच आम्हाला उशिरा परमिट पाठवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती सलाबतपुर कृषी मंडलाधिकारी यांनी दिली.
परंतु या माहितीचा काही उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही तसेच सलाबतपूर कृषी मंडळ खात्याचे वराती मागून घोडे असा प्रकार पहावयास मिळत आहे.
त्यामुळे सलाबतपुर मंडळ परिसरातील सर्व शेतकरी कृषी खाते व कृषी अधिकारी यांच्यावरती नाराजी व्यक्त करीत आहेत . पेरणीच्या अगोदर परमिट त्यांनी एक महिना दिले असते तर कदाचित शेतकऱ्यांना बियाणे मध्ये हातभार लागला असता महागाचे बियाणे घेऊन शेतकऱ्यांना पेरणी करावी लागली याला जबाबदार केवळ मंडल कृषी खातेच असल्याचेही शेतकरी वर्गामध्ये बोलले जात आहे तसेच हे हा बे जबाबदारपणा शासनाचाच असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे तसेच कृषी खात्या बद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.