Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

मेरी जरूरते कम है इसलिये मेरे जमीर मे दम है:- डीवायएसपी खाडे..

0 4 5 2 7 1

मेरी जरूरते कम है इसलिये मेरे जमीर मे दम है:-डीवायएसपी खाडे..

नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

माझ्या बालपणापासून तर आतापर्यंत वयाच्या गेल्या पंचविस वर्षांपर्यंत मी पहातो तसे माझ्या आई वडीलांनी ऊसाच्या फडात कोयता अन उसाची मोळी उचलण्याचे अपार कष्ट केलेले आहेत. हे काम करत असताना आमच्या कुटूंबियांची दिवाळी सणही नेहमीच उसाच्या फडात साजरा झालेला आहे. सततच्या गरिबीमुळे आमच्या गरजा आतापर्यंत कमीच रहात आलेल्या आहेत. माझ्या पगारात माझा आणि आई – वडीलांचा खर्च मोठ्या आनंदात भागत आहेत. गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहेत याचे मुख्य कारण म्हणजे मेरी जरूरतें कम हैं, इसलिए मेरे जमीर में दम है असे वक्तव्य नेवासा पोलीस ठाण्याचे परीक्षाविधीन प्रभारी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना केले.

यावेळी त्यांनी नेवासा पोलीस
ठाण्यात केलेल्या कारवाईचा थेट लेखाजोखाच पत्रकारांसमोर स्पष्टपणे मांडला. आपण अवैध धंदे करणारांची दादागिरी मोडीत काढून खाकीची शान आणि मान वाढविणार असल्याचे सांगितले. खाकीच्या रुबाबाची शिस्त लावून गुंडांचा बिमोड करत सज्जनांना भयमुक्त वातावरण करुन या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा नगरीची धार्मिकदृष्ट्या असलेली ओळख सातासमुद्रापार घेवून जाण्यासाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.

4.5/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
00:22