Breaking
ई-पेपर

*शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराम हायस्कूलचा झेंडा; श्लोक पेहरकर राज्य गुणवत्ता यादीत झळकला*

0 8 9 9 5 4

*शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराम हायस्कूलचा झेंडा; श्लोक पेहरकर राज्य गुणवत्ता यादीत झळकला*

नेवासा (भानसहिवरा ) – प्रतिनिधी –

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या भानसहिवरा येथील श्रीराम हायस्कूलचा विद्यार्थी श्लोक अशोक पेहरकर याने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा (२०२५-२६) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्य गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून संपूर्ण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या अभिमानास्पद यशानिमित्त विद्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक शेंडगे व पर्यवेक्षक ऋषिनाथ बोरुडे यांच्या हस्ते श्लोकचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र शेटे, अर्जुन शिंदे, संतोष तोडमल, महेंद्र झाडे, श्रीमती मेहेत्रे, बाळासाहेब घुले, चंद्रकांत अल्ली यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी श्लोकच्या यशाचे कौतुक करत त्याच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक अशोक शेंडगे आणि पर्यवेक्षक ऋषिनाथ बोरुडे म्हणाले, “श्लोकने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून भविष्यातही तो यशाची नवी शिखरे सर करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
श्लोक पेहरकरच्या या उल्लेखनीय यशामुळे भानसहिवरा परिसरासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. श्रीराम हायस्कूलच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडणारी ही कामगिरी मानली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे