Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

*तेराशे कोटी रामनाम जप अभियानात सात दिवसांत पहिल्या रजिस्टरची पूर्तता; सौ. सुनीताताई गव्हाणे यांचा सन्मान*

0 8 9 9 1 8

*तेराशे कोटी रामनाम जप अभियानात सात दिवसांत पहिल्या रजिस्टरची पूर्तता; सौ. सुनीताताई गव्हाणे यांचा सन्मान*

नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

तेराशे कोटी रामनाम जप अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अवघ्या सात दिवसांत पहिले रामनाम जपाचे रजिस्टर पूर्ण करून उल्लेखनीय विक्रम करणाऱ्या सौ. सुनीताताई कृष्णा गव्हाणे यांचा साई ॲग्रो सर्व्हिसेस, कुकाणा येथे सन्मान करण्यात आला.
यावेळी सौ. उषा भागवत खराडे यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी भागवत साहेब खराडे, शरदभाऊ गरड, कृष्णाभाऊ गव्हाणे तसेच पत्रकार संतोष औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष बाब म्हणजे, सौ. सुनीताताई गव्हाणे यांचे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झालेले असतानाही त्यांनी प्रबळ इच्छाशक्ती, श्रद्धा आणि सातत्याच्या बळावर अवघ्या सात दिवसांत रामनाम जपाचे पहिले रजिस्टर पूर्ण केले. त्यांच्या या कार्याने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, शिक्षणापेक्षा दृढ निश्चय आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, “इच्छाशक्ती असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते,” असा संदेश दिला. त्यांच्या या यशामुळे रामनाम जप अभियानाला नवसंजीवनी मिळाली असून अनेक भाविक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित होत आहेत.
दरम्यान, तेराशे कोटी रामनाम जप अभियानात सहभागी होण्यासाठी इच्छुक भाविकांना विनामूल्य रामनाम जप रजिस्टर उपलब्ध करून दिले जात आहे. इच्छुकांनी साई ॲग्रो सर्व्हिसेस, कुकाणा येथे संपर्क साधावा किंवा भागवत साहेब खराडे यांच्याशी मो. 9270449453 वर संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

3/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे