जेष्ठ नागरिक दीना निमित्ताने किड्स किंग्डम विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन…
जेष्ठ नागरिक दीना निमित्ताने किड्स किंग्डम विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन…
कुकाणा – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा करण्याचा उद्देश जगभरातील ज्येष्ठांचा सन्मान करणे आणि त्यांना विशेष वाटणे हा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिदिन आदर केला जात असला तरी ते आपल्यावर ओझे नाहीत याची जाणीव या विशेष दिवशी करून दिली जाते. उलट त्याच माळीने आपण ज्या सुंदर बागेत फुलतोय त्याला पाणी पाजून ते सुंदर बनवले आहे. हा दिवस ज्येष्ठांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो याच अनुषंगाने कुकाणा येथे किड्स किंग्डम विद्यालयात चिमुकल्यांच्या आज्जी आजोबांना सन्मान मिळावा म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्रमुख कीर्ती बंग यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. यात माझी बायको आमदार,संगीत खुर्ची, आदी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आज्जी आजोबानी सहभाग घेत आनंद घेतला यात, सहभागी झालेल्या आज्जी आजोबांना सन्मानित देखील करण्यात आले, काही सांस्कृतिक गेम्स या वेळी घेण्यात आले होते त्यात जेष्ठ दिलीप बोरा व जया बोरा तसेच जालिंदर सरोदे व द्वारका सरोदे या जोडप्यानी विजय मिळवल्याने त्यांचा सन्मान व्यासपीठावर करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता बडे यांनी केले तर प्रतिभा कदम,सोनाली जामदार,कोमल म्हस्के, पूजा पवार आदी शिक्षिका कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रतिभा कदम यांनी मानले.