Breaking
ई-पेपर

*४१ वर्षांनंतर रिमांड होमच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; आगळे सरांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतेचा अनोखा सन्मान*

0 9 0 0 1 5

*४१ वर्षांनंतर रिमांड होमच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; आगळे सरांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतेचा अनोखा सन्मान*

शेवगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क

आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथील रिमांड होम व वसतिगृहात १९८५ पूर्वी वास्तव्यास राहून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ४१ वर्षांनंतर भावनिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. जुन्या सवंगड्यांच्या भेटीगाठी, आठवणींना उजाळा आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा विशेष ठरला.
यावेळी रिमांड होमचे तत्कालीन प्रमुख आगळे सर यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल गमे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर. बी. गोरे सर, लव्हाट सर, संजय गुरु, काकडे सर, विक्रम लांडे सर, भगवान आगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सखाहरी कोरडे, भाऊसाहेब बोडके, ज्ञानदेव नजन, ह.भ.प. राम उदागे महाराज, पुंजाजी सोलाट, वाल्मीक कोरडे, प्रकाश घाडगे, इस्माईल शेख, संजय गोसावी, सौ. रीता जाधव, भाऊसाहेब सोलाट, नानासाहेब शिंदे, सय्यद लालाभाई, दत्तात्रय काळे, राजाराम दाते, बाबासाहेब खराडे, गोरख भगत, दत्तात्रय उबाळे, बाबासाहेब जरांगे, कैलास ढाणके, सुखदेव पवार, रंगनाथ घारे, सुरेश साळुंके, आनंदा धनवटे, अशोक दुधाडे, भाऊराव वीर, मधुकर गायकवाड यांची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना आगळे सर म्हणाले, “अत्यंत कठीण परिस्थितीत रिमांड होम चालविताना आबासाहेब काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला. आज हेच विद्यार्थी प्रेमाने एकत्र येऊन माझा सत्कार करत आहेत, ही माझ्या शिक्षकी जीवनाची सर्वात मोठी कमाई आहे.”
ते पुढे म्हणाले, “या विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षी माझा वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि जिव्हाळा पाहून माझे शिक्षकी जीवन सार्थकी लागल्याचे समाधान वाटते.”
कार्यक्रमात अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत रिमांड होममधील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे आयोजन सखाहरी कोरडे यांनी केले. सूत्रसंचालन सुखदेव पवार यांनी केले, तर ज्ञानदेव नजन यांनी विशेष सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्याने स्नेहमेळावा आणि अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे