*तरवडी येथे चैत्य काणिफनाथ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा*

*तरवडी येथे चैत्य काणिफनाथ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा*
नेवासा तालुका | प्रतिनिधी-
तरवडी (ता. नेवासा) येथे श्री चैत्य काणिफनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन गुरुवारी, दि. ३ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
गुरुवर्य कुलदीपजी महाराज यांच्या आयोजनाखाली होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात सकाळी ८ वाजता भव्य मिरवणुकीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलश पूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, तर रात्री ९ वाजता नाथ गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
मिरवणुकीत मिलन ब्रास बँड देवळाली, ए.एस. नं. बँजो शेवगाव, हलकी व कच्ची पथक राहुरी, सनई सूर जेऊर तसेच ढोलबाजा अहिल्यानगर यांचा सहभाग राहणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गुरुवर्य कुलदीपजी महाराज यांच्यासह आयोजकांनी केले आहे.




