Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

*वाकडी येथे बैलपोळा उत्साहात; राजयोद्धा युवा प्रतिष्ठानचा उत्स्फूर्त सहभाग*

0 9 5 0 2 3

*वाकडी येथे बैलपोळा उत्साहात; राजयोद्धा युवा प्रतिष्ठानचा उत्स्फूर्त सहभाग*

नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांच्या जीवनातील जिव्हाळ्याचा आणि कृतज्ञतेचा सण असलेल्या बैलपोळा सणानिमित्त वाकडी ता. नेवासा येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या कष्टात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांची आकर्षक सजावट करून त्यांचे पूजन करण्यात आले. रंगीबेरंगी शिंगे, गोंडे, झुली व विविध अलंकारांनी सजलेल्या बैलजोड्या सणाचे विशेष आकर्षण ठरल्या.
या बैलपोळा सोहळ्यात राजयोद्धा युवा प्रतिष्ठान, वाकडी यांच्या वतीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बैलजोड्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजयोद्धा ग्रुपचे उद्योजक सचिन भाऊ काळे, अध्यक्ष राजू नजन, दादासाहेब काळे सर, मनोज कार्ले, गोविंद काळे, आदिनाथ कार्ले, योगेश काळे, भागचंद काळे, सागर काळे,देविदास काळे,डॉ. स्वप्नील जाधव, निखिल कराळे यांच्यासह राजयोद्धा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते वाकडी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांविषयी असलेली शेतकऱ्यांची आत्मीयता आणि ग्रामीण संस्कृतीशी असलेले नाते यावेळी प्रकर्षाने जाणवले. ‘शेतकऱ्याचा खरा सोबती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. प्रतिष्ठानच्या सहभागामुळे सणाच्या उत्साहात आणखी भर पडली.

1.3/5 - (3 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे