Breaking
ई-पेपर

यात्रा उत्सवाने गावाचा एकोपा दृढ होतो. मा मंत्री शंकरराव गडाख.

0 9 0 0 1 5

यात्रा उत्सवाने गावाचा एकोपा दृढ होतो.
मा मंत्री शंकरराव गडाख.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

सोनई येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगदंबा मातेस जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख व अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख यांच्या हस्ते महाआरती पार पडली.
यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, सोनईची जगदंबा देवीची यात्रा ही मोठी परंपरा असलेली असून या उत्सवाच्या निमित्ताने गावातील सर्व नागरिक एकत्र येतात. त्यामुळे गावाचा एकोपा जपला जातो आणि विचारांची देवाणघेवाण घडते. सर्वांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे व उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले
सर्वाना यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख, माजी सरपंच हरिभाऊ दरंदले, भाऊसाहेब निमसे, बाळासाहेब बनकर, बाबा अनारसे, राजेंद्र बोरुडे, प्रकाश शेटे, उदय पालवे, डॉ. माऊली दरंदले,उपसरपंच प्रसाद हारकळे, आप्पासाहेब निमसे, कल्याण गडाख, वसंतराव कुसळकर, मच्छिंद्र कुसळकर, सचिन गर्जे, महावीर चोपडा, डॉ. रामनाथ बडे, रणजित जाधव, सुभाष निमसे, संजय गर्जे, राहुल राख, विकी राऊत, सचिन भागवत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे