Breaking
ई-पेपरराजकिय

*शहापूरच्या विकासाला नवी गती; आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते ३५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन*

0 8 9 9 9 5

*शहापूरच्या विकासाला नवी गती; आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते ३५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन*

नेवासा प्रतिनिधी :

नेवासा तालुक्यातील शहापूर गावाच्या विकासाला चालना देणाऱ्या ३५ लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज (दि. १२) सकाळी ९ वाजता आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते आणि विशेष प्रयत्नांतून उत्साहात संपन्न झाला.

या विकासकामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासाठी २० लाख रुपये, लक्ष्मी माता मंदिरासमोरील सर्व मंडप उभारणीसाठी १० लाख रुपये आणि गावांतर्गत काँक्रिटीकरण रस्त्यासाठी ५ लाख रुपये, अशा एकूण ३५ लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले, “ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले आहे. पालकमंत्र्यांसह शासनाच्या वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने मांडला. सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्याचे समाधान आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या अद्याप संपलेल्या नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “आजही शेतकरी रात्रभर शेतात पाणी देण्यासाठी कष्ट करत आहे; मात्र त्याला कष्टाच्या मानाने योग्य मोबदला मिळत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाला हमीभाव, सिंचन आणि विकासकामांसाठी मी विधानसभेत सातत्याने आवाज उठवत आलो आहे. नेवासा तालुक्यातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि ज्या विभागाकडे निधी उपलब्ध आहे, त्या विभागातून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत राहीन.”

भविष्यातील विकासासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन करत ते म्हणाले, “गावाचा आणि तालुक्याचा विकास हा सर्वांचा समान ध्यास असला पाहिजे. विकासाच्या वाटचालीत प्रत्येकाने सहकार्य करावे.”

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. बाळासाहेब कोलते यांनीही मनोगत व्यक्त करत गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास जानार्धन कोलते, संजय कोलते, सचिन दारकुंडे, नामदेव कोलते, संदीप आरगडे, सुरेश कोलते, उत्तम कोलते, वसंत कोलते, गणेश काळभोर, भारत गायकवाड, माजी सरपंच शंकर कोलते, विष्णुपंत कोलते,संदीप कोलते,नवनाथ कोलते, नवनाथ साळुंके, डॉ. कोलते, सरपंच सौ. मनिषा कोलते, एकनाथराव कोलते, विश्वासराव काळे, काकासाहेब कोलते, संपुभाऊ कोलते, बाळासाहेब मांडेश, ग्रामसेवक आरगडे मॅडम, तुळशीदास शिंदे, रामदास शिंदे, आदीनाथ निकम, बाळासाहेब श्रीरसागर, मच्छींद्र कावरे, इंजिनिअर प्रसाद देशमुख, भागवत ऋषिकेश, जयदीप कोलते, संकेत मांडे, बाळासाहेब कचरे, कुंदन भंडारी, मच्छींद्र मुंगसे, संभाजी देवकर, किरण शिंदे, महेश नवले, अभय कोलते, प्रविण मांजरे, इंजिनिअर शेळके यांच्यासह शहापूर ग्रामस्थ, महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३५ लाख रुपयांच्या विकासकामांच्या शुभारंभामुळे शहापूर गावातील मूलभूत सुविधांमध्ये भर पडणार असून ग्रामविकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

3/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे