माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या योगदानाला सलाम पाथर्डीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहमेळावा उत्साहात.

माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या योगदानाला सलाम पाथर्डीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहमेळावा उत्साहात.
अहिल्यानगर प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील आदिनाथनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सन २००४-०५च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. २५) थाटात पार पडला. तब्बल २० वर्षांनी एकत्र जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या गुरुजनांचा यथोचित सन्मान केला. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात यशस्वी झाल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब ताठे होते. मुख्याध्यापिका अलका भणगे, लता शितोळे, शीला नजन, मच्छिंद्र गरड, पोपट जाधव, अजय रक्तटे, अरुण कराळे, आसाराम भगत, राजळे आदी
उपस्थित होते. सरस्वती पूजन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व गुरुजनांचा सत्कार करत माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला आणि शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकांनी आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर जीवनातील मूल्ये, शिस्त आणि आत्मविश्वासही शिकवला. त्यांच्या
मार्गदर्शनामुळे आम्ही विविध क्षेत्रांत यशस्वी झालो. शिक्षकांनी आमच्या चुका सुधारल्या आणि आम्हाला स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली. आमच्या यशामागे शिक्षकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन असल्याचे गौरवोद्गार संदीप शेरकर, अर्चना तुपे, अश्विनी घोडके, मनीषा चितळे, शुक्ल नेहुल, निशा तिजोरे, अर्चना चितळे, सुनिता मरकड यांनी व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त
केले. या वेळी मुख्याध्यापिका भणगे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ बोरुडे, विकास बडे, सुरेश होले, अनिल लोखंडे, बिभीषण कोठे, योगेश पायमोडे, बंडू वेताळ,संतोष कावरे आणि बाळू मरकड यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा तनपुरे आणि कविता शेळके यांनी केले. विकास बडे यांनी आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.