*जीवनाला कलाटणी देणारा गुरु म्हणजे शिक्षक; गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान* – *राहुल डोळस*

*जीवनाला कलाटणी देणारा गुरु म्हणजे शिक्षक; गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान* – *राहुल डोळस*
नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सलाबतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात ग्रामपंचायत सदस्य राहुल डोळस व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राहुल डोळस म्हणाले, “प्रत्येकाच्या जीवनातील पहिले गुरु हे आई-वडील असतात. विद्यार्थ्यांनी नेहमी आई-वडिलांचा आदर करावा आणि शाळेत जाताना त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. शिक्षकांप्रती कायम कृतज्ञतेची भावना ठेवणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. शिक्षक हे केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन जीवनाला कलाटणी देणारे खरे शिल्पकार असतात. विशेषतः प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भक्कम पाया रचतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.”
या कार्यक्रमात शिक्षकांचे पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल डोळस, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भांड, समिती सदस्य नवनाथ कदम, सोपान चावरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक झावरे सर, राजेंद्र मुंगसे, राहुल लोखंडे, सलीम शेख, विठ्ठल घोडके, कलापुरे मॅडम, कोल्हे मॅडम तसेच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील मरकड सर, इटकर सर, आहेर सर, इतर शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.




