Breaking
ई-पेपर

*देवटाकळीच्या धनंजय नागपुरे यांची राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षणासाठी देशात चौथ्या क्रमांकाने निवड*

0 8 9 9 1 8

*देवटाकळीच्या धनंजय नागपुरे यांची राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षणासाठी देशात चौथ्या क्रमांकाने निवड*

शेवगाव (वार्ताहर):महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

जिजामाता माध्यमिक विद्यालय, देवटाकळीचे मुख्याध्यापक मा. श्री. सुशीलकुमार नागपुरे यांचे चिरंजीव कु. धनंजय सुशीलकुमार नागपुरे यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शेवगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

NSNIS (Netaji Subhas National Institute of Sports), बेंगळुरू येथे आयोजित प्रतिष्ठित एक वर्षीय स्पोर्ट्स कोचिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी देशभरातून झालेल्या निवड प्रक्रियेत धनंजय नागपुरे यांनी भारतातील अव्वल 120 गुणवंत उमेदवारांमध्ये चौथा क्रमांक मिळवत गुणवत्तेनुसार आपली निवड निश्चित केली. ही कामगिरी त्यांच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि क्रीडाप्रती असलेल्या समर्पणाची साक्ष देणारी आहे.

धनंजय यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी श्री. प्राचार्य वाबळे सर, प्रा. श्री. नावथर सर, प्रा. श्री. गवळी सर, श्री. घुले सर, भाऊसाहेब श्री. प्रशांत वाबळे सर, सौ. बाचकर मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

धनंजय नागपुरे यांच्या या यशामुळे देवटकळी गाव, शेवगाव तालुका आणि संपूर्ण जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, त्यांच्या या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे