मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. शैलेश हिंगे साहेब अहिल्यानगर यांनीं पुनर्वसन गाव मजलेशहरला दिली भेट…

*कर्तव्यदक्ष मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. शैलेश हिंगे साहेब अहिल्यानगर यांनीं पुनर्वसन गाव मजलेशहरला दिली भेट…
अहिल्यानगर प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मा. अपर जिल्हाधिकारी श्री.शैलेश हिंगे साहेब यांनी मजले शहर येथे भेट दिली असता जायकवाडी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष श्री मच्छिंद्र आर्ले, आप्पासाहेब फटांगडे, संदीप बेळगे, शेषराव पैलवान ,रमेश पैलवान, छोटू नरवडे, विठ्ठल काटे, नानासाहेब रोकडे, बादशाह शेख, मनोज दळवी यांनी मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानून सत्कार केला व पुढील समस्या बाबत चर्चा केली.
1) पुनर्वसित गावांना ११ नागरी सुविधांची अंमलबजावणी व्हावी.
२) ज्या प्रकल्पग्रस्तांना अद्याप उपजीविकेसाठी जमीन मिळाली नाही त्यांना जमीन वाटप करणेत यावे.
३) प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनीमध्ये वहिवाटीसाठी कायदेशीर रस्ता मिळावा.
४) मिळालेल्या जमिनीला १२ माही मुळा धरणाचे पाणी मिळावे व पोट चाऱ्या दुरुस्त करून मिळाव्या.
५) पुनर्वसन गावांचे जुने रेकॉर्ड दुरुस्त करून घेण्यात यावे ( उदा. संपादित जमिनीचे ७-१२, फेरफार ,जन्म- मृत्यू व शाळेचे दाखले सहजरित्या मिळावे.
६) जायकवाडी प्रकल्पग्रस्तांना नोकरीस प्राधान्य द्यावे व ज्या कुटुंबांना शासकीय नोकरीचा लाभ मिळाला नाही अशा कुटुंबांना किमान 25 लाख रुपये मोबदला मिळावा.
७)संपादित झालेल्या जमिनीलगतच्या जमिनी पाण्यामुळे नापीक झाल्या त्यांचा रीतसर पंचनामा करून मोबदला मिळावा.
८) प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या घराच्या प्लॉटवर वन विभागाने ताबा घेतलेला आहे त्या प्रकल्पग्रस्तांची यादी करून त्यांना पर्यायी प्लॉट द्यावे.
९) शासनाने ज्या प्रकल्पग्रस्तांना प्लॉट दिले परंतु ग्रामपंचायतने घरापूरती जागा नावावर केली बाकी जागा नावावर नाही.
१०) ज्या भूमीहीन लोकांना घरकुल आले परंतु त्यांना जागा नाही त्यांना जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी.
११) ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र गहाळ/ हरवले आहे त्यांना नवीन प्रमाणपत्र मिळावे.
वरील समस्यावर मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी समाधानकारक चर्चा केली व समस्या सोडवण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले .यावेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त व मजलेशहर तलाठी तुपे मॅडम ,कृषी अधिकारी आव्हाड मॅडम ,कुकाणा मंडळ साळवे मॅडम, तलाठी क्षिरसागर ,लिपिक मुक्तार शेख उपस्थित होते. त्यानंतर मच्छिंद्र आर्ले पाटील यांच्या राज्ञा निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री.शैलेश हिंगे साहेबांचा सत्कार करण्यात आला.




