Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपर

*अभिनव आदर्श डिजिटल क्लासेस, कुकाणाच्या विद्यार्थ्यांचे चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*

0 8 9 9 1 8

*अभिनव आदर्श डिजिटल क्लासेस, कुकाणाच्या विद्यार्थ्यांचे चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*

नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

अभिनव आदर्श डिजिटल क्लासेस, कुकाणा येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
क्लासेसमधील कुमारी आरोही सचिन लोंढे हिने २२८ गुण मिळवत क्लासमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मल्हार पंजाबराव देशमुख याने २२० गुण मिळवत द्वितीय क्रमांकासह कुकाणा शाखेत विद्यार्थी (मुले) प्रथम होण्याचा मान मिळविला. सई संदीप बावळे हिने १९४ गुण मिळवत तृतीय, ईश्वरी सुरेश कचरे हिने १६४ गुण मिळवत चतुर्थ, तर ओम शहादेव बेंबळे याने १६२ गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची जिद्द, नियमित अभ्यास, पालकांचे सहकार्य आणि अनुभवी शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळविल्याने परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
अभिनव आदर्श डिजिटल क्लासेसमध्ये इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंत प्रवेश सुरू असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल अध्यापन आणि स्पर्धा परीक्षांसाठी प्रभावी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व अभिनव आदर्श डिजिटल क्लासेसच्या संपूर्ण टीमचे विविध शैक्षणिक, सामाजिक आणि नागरिक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

4/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे