Breaking
ई-पेपर

व्यायाम, आरोग्य आणि चांगले संस्कार ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री :पो नि.महेश पाटील

0 6 0 5 0 3

व्यायाम, आरोग्य आणि चांगले संस्कार ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री : पो. नि.महेश पाटील

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, खेळ यांचाही विकास होणे गरजेचे आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम, आरोग्य आणि चांगले संस्कार या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा, असे प्रतिपादन नेवासा येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.


श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री रवींद्र मोटे हे होते. व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री शिवाजी कोलते , प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, गणेश गव्हाणे, श्री बाळासाहेब डहाळे, अल्ताफ शेख, मेस्माळे, बाळासाहेब उगलमुगले, नामदेव शिंदे, परीक्षक प्राचार्य ओंकार रसाळ आणि मच्छिंद्र पानकर, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, डॉ. काकासाहेब लांडे कार्याध्यक्ष डॉ. अजित गेडाम, सहकार्याध्यक्ष, डॉ. अनुराधा बोठे उपस्थित होते.
महाविद्यालयीन जीवन हे आनंददायी असून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत इतर कलागुणांबरोबरच आपले शरीरआणि मन घडवावे असे श्री रविंद्र मोटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यात नृत्य, नाटिका, समूहगान, देशभक्तीपर गीत, शिवकालीन मर्दानी खेळ, टिपरी गीत विनोदी बातमी, तसेच पारंपरिक व आधुनिक कलाविष्कारांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मोहिनी साठे, डॉ. रामदास आरले, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. संजय महेर, शास्त्र शाखाप्रमुख प्रा. केशव चेके, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्ता वाकचौरे, प्रा. संतोष शेळके श्री रवींद्र पाटील, श्री लक्ष्मण ओहोळे, श्री प्रशांत चव्हाण, अरबाज शेख यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने महाविद्यालयात आनंददायी व उत्साही वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक सागडे आणि प्रा. सुलतान आतार यांनी केले, तर डॉ. अनुराधा बोठे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे