जायकवाडी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांची विधानसभेत मागणी!
सरकारने कवडीमोल किंमतीमध्ये जलाशयासाठी जमीनी घेवून प्रकल्पग्रस्तांना मुलभूत सुविधा आजही मिळत नसल्याचे वेधले थेट मंञालयात लक्ष!
जायकवाडी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांची विधानसभेत मागणी!
सरकारने कवडीमोल किंमतीमध्ये जलाशयासाठी जमीनी घेवून प्रकल्पग्रस्तांना मुलभूत सुविधा आजही मिळत नसल्याचे वेधले थेट मंञालयात लक्ष!
नेवासा (प्रतिनिधी) -महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा अहिल्यानगर
जायकवाडी धरणाच्या प्रकल्प ग्रस्तांना सरकारने न्याय देण्याची थेट मागणी स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी प्रश्नोउतोरांच्या तासात उपस्थित करुन या प्रकल्पग्रस्तांच्या हाल-अपेष्ठा थांबविण्यासाठी सविस्तर मुद्दे मंञालयात उपस्थित करुन प्रकल्पग्रस्तांना मा़येचा आधार देण्याची खमकी भूमिका घेवून या जायकवाडी जलाशयासाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमीनी सरकारने कवडीमोल भावात घेवून सध्याही या प्रकल्पग्रस्तांना भौतिक – सुविधा मिळत नसून गेल्या ४० – ५० वर्ष लोटूनही आजही या प्रकल्पग्रस्तांना संकटाचा सामना करावा लागत आहे या लोकांना अंत्यविधीसाठी आजही जागा नाही तसेच या गावांना निट रस्तेही नाहीत त्यामुळे आता तरी राज्य सरकारने या प्रकल्पग्रस्तांना सोयी-सुविधा देण्यासाठी खास बाब म्हणून स्वतंञ निधी देण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे -पाटील यांनी विधानसभेत केली.
यावेळी बोलतांना आमदार लंघे – पाटील पुढे म्हणाले की,शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या या जमीनी जायकवाडी धरणासाठी शेतकऱ्यांकडून सुमारे ७०० ते १२०० रुपयांनी घेवून अद्यापही गेल्या ४०-५० वर्षांपासून राज्य सरकार या प्रकल्पग्रस्तांच्या मुलभूत सुविधेकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे गावे आजही मुलभूत सुविधापांसून दुर असल्याचा मुद्दा यावेळी आमदार लंघे – पाटील यांनी थेट मंञालयात उपस्थित करुन धरणग्रस्तांना न्याय देण्याची खमकी प्रमुख मागणी यावेळी केल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्यावर प्रकल्पग्रस्तांकडून मोठा कौतुकाचा वर्षाव केला जात असून सरकार आता आमदार लंघे – पाटील यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत मांडल्यामुळे सरकारही आता प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेत राहणार असल्याचा विश्वास प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केला जात आहे.




