Breaking
ई-पेपर

श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सवात पाच दिवस.विविध कार्यक्रमाचे आयोजन.

0 6 0 4 8 0

श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सवात पाच दिवस.विविध कार्यक्रमाचे आयोजन.

घोडेगाव ( वार्ताहर)- दिलीप शिंदे

 

येथील ग्राम देवता श्री घोडेश्वरी देवीचा यात्रा महोत्सव सालाबाद प्रमाणे आयोजीत करण्यात आला आहे.श्री घोडेश्वरी देवी यात्रेत मधे परिसरातील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे मदतीने यात्रा उत्सवात भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून परिसरात स्वच्छता केली आहे. मिठाई,खेळणी,वदुकासाठी व्यवस्थित जागा उपलब्ध करुन देण्यात आली. प्रसस्थ पार्किंग ,पिण्याचे पाणी दर्शन बारी, देणगी कक्ष ,हरवले-सापडले विभाग,सीसी टी व्हि कॅमेरे ,कुस्त्यांचे मैदान अशी सर्व व्यवस्था करृणयात आली आहे. तरी येणा-या भाविकांनी शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.
यात्रेत निमित्ताने दिनांक चार मार्च शनिवार पासून नऊ मार्च गुरुवार पर्यंत पुढील प्रमाणे कार्यक्रमाची तयारी केली आहे.
शनीवारी रात्री ह भ प कविराज झावरे यांचे किर्तन वेळ रात्री नऊ वाजता.
रविवारी रात्री ह भ प प्रल्हाद कळमसरे यांचे किर्तन रात्री नऊ वाजता.
सोमवारी रात्री ह भ प निवृत्ती महाराज यांचे किर्तन रात्री नऊ वाजता.
मंगळवारी पहाटे सहा वाजता पवित्र गंगाजल कावड मिरवणूक, श्री घोडेश्वरी देवीस गंगाजल अभिषेक, सकाळी साडे नऊ वाजता देवीस चोळी पातळ,खणा-नारळाने ओटी भरणं कार्यक्रम. रात्री सात वाजता पालखी मिरवणूक (छबिना) .रात्री नऊ वाजता महाआरती, मंदिरा समोर शोभेच्या दारूची आतषबाजी. दहा वाजता आनंद महाजन यांचा तमाशा मोफत दाखविला जाईल.
बुधवारी सकाळी आठ ते अकरा वाजे पर्यंत आनंद महाजन तमाशाची देव हजेरी. रात्री नऊ वाजता पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर यांचा तमाशा मोफत दाखविला जाईल.
गुरुवारी सकाळी आठ वाजता देणगी दादांचा सन्मान. नऊ वाजता रघुवीर खेडकर तमाशाचा देव हजेरी कार्यक्रम. रात्री नऊ वाजता घोडेश्वरी नाट्य कला अकॅडमी चे माहेरची पाहुणी हे नाट्य मोफत सादर केले जाईल.
बुधवारी दुपारी चार वाजता श्री घोडेश्वरी केसरी कुस्त्यांचे भव्य जंगी हगामा होणार आहे. यात प्रथम कुस्ती साठी ७१०००रु तर ६१००० ,५१००० , ४१०००,३१०००, २१०००, १५०००, ११०००, रुपये असे कुस्त्यांचे ईनाम दिले जातील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे