Breaking
ई-पेपर

*अज्ञात वाहनाच्या धडकेत वारकरी भाविकाचा दुर्दैवी अंत; नेवासा ग्रामीण रुग्णालयातून मोफत रुग्णवाहिकेने हिंगोलीकडे पार्थिव रवाना*

0 8 9 9 8 9

*अज्ञात वाहनाच्या धडकेत वारकरी भाविकाचा दुर्दैवी अंत; नेवासा ग्रामीण रुग्णालयातून मोफत रुग्णवाहिकेने हिंगोलीकडे पार्थिव रवाना*

नेवासा | प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

आषाढी वारीसाठी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पायी दिंडीसोबत पंढरपूरकडे निघालेल्या एका वारकरी भाविकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी घटना घडली. या घटनेमुळे वारकरी संप्रदायासह परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर संबंधित वारकरी भाविकाचा मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात आले.
या दुःखद प्रसंगी मृत वारकऱ्याच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील तसेच नगराध्यक्ष किरण घुले पाटील यांनी पुढाकार घेत हिंगोली येथे पार्थिव नेण्यासाठी मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था उपलब्ध करून दिली. रुग्णवाहिका चालक रवी निकम यांनी अत्यंत जबाबदारीने व संवेदनशीलतेने पार्थिव सुरक्षितपणे हिंगोली येथे पोहोचविण्याचे कार्य पार पाडले.
आषाढी वारी ही श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानली जाते. मात्र, अशा दुर्घटनांमुळे वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारी मार्गावर वाहतूक नियंत्रण, सुरक्षितता आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
या दुर्दैवी घटनेबद्दल वारकरी संप्रदायासह सर्व स्तरातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत असून, दिवंगत वारकरी भाविकास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे