Breaking
ई-पेपर

श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सवास शनिवार पासून प्रारंभ….

0 6 0 4 8 0

श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सवास शनिवार पासून प्रारंभ….

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

घोडेगाव (ता. नेवासा) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाला शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. यात्रा निमित्त कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून, परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

यात्रेची सुरुवात त्रिदिनी कीर्तन महोत्सवाने होणार आहे. शनिवारी (दि. 4) हभप कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन होईल. रविवारी (दि. 5) हभप प्रल्हाद महाराज कळमसरे तर सोमवारी (दि. 6) समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन होणार आहे.

मंगळवारी (दि. 7) पहाटे गंगेतून आणलेल्या कावडींची भव्य मिरवणूक काढण्यात येईल व त्यानंतर घोडेश्वरी मातेस जलाभिषेक केला जाईल. सकाळी 9 वाजता यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने देवीला चोळी-पातळ अर्पण करून महाआरती करण्यात येईल. दिवसभर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था असेल. सायंकाळी 6 वाजता छबिना मिरवणूक तर रात्री 9 वाजता फटाक्यांची आतषबाजी होईल. रात्री 10 वाजता आनंद लोकनाट्य तमाशा मोफत सादर करण्यात येणार आहे.

बुधवारी (दि. 8) आनंद लोकनाट्याचा देव हजेरी कार्यक्रम होईल. दुपारी 4 वाजता भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांच्या कुस्तीचाही समावेश आहे. रात्री 9 वाजता पद्मश्री पुरस्कार विजेते मास्टर रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे.

गुरुवारी (दि. 9) सकाळी खेडकर यांच्या लोकनाट्याचा देव हजेरी कार्यक्रम होईल. तसेच यात्रा कमिटी वतीने दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल. रात्री श्री घोडेश्वरी नाट्य कला अकॅडमीतर्फे “माहेरची पाहुणी” या नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने परिसरातील नागरिकांना केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे